डोंबिवली : ‘ओंजळीतील शब्दफुले समूह’ आयोजित ‘आम्ही ओंजळकर…’ हे साहित्य स्नेहसंमेलन डोंबिवलीतील गणपती मंदिरातील विनायक हॉल, येथे दिमाखदारपणे संपन्न झाले. या संमेलनाचे डॉ.विजय जोशी (ऑस्ट्रेलिया) संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विजय फडणीस तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ गझलकार प्रशांत वैद्य या मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद या संमेलनाला लाभले. या सर्वांचे विचार, मार्गदर्शन, रचना यांचा उपस्थित ओंजळकरांनी मनभरून आनंद घेतला.

काव्यरत्नांची ओळख, साहित्यिक प्रश्नमंजुषा, उपस्थितांचे काव्यसंमेलन, आणि मांन्यवरांचे विचार असा भरगच्च कार्यक्रम दिवसभरात संपन्न झाला. ‘आम्ही ओंजळकर…’ स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी समूह प्रशासक विचैमा (विजय जोशी, चैत्राली जोगळेकर आणि मानसी चापेकर) यांनी विशेष मेहनत घेतली. अशी माहिती समूह प्रशासक कवी विजय जोशी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *