अवघ्या पाच तासात अंबरनाथ- बदलापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम तासात रद्द 

२४ नोव्हेंबरला होणार होती निवडणूक : राजकीय चर्चांना उधाण 

बदलापूर : अंबरनाथ नगरपरिषद आणि कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूकीचा कार्यक्रम जिल्हाधिका- यांनी  २४ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे आज दुपारी जाहिर केले. पण संध्याकाळी पून्हा एक परिपत्रक काढून हि निवडणूक अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले.त्यामुळे अवघ्या पाच तासात जिल्हाधिकारी कार्यालयाला आपला निवडणूकींचा  कार्यक्रम रद्द  करावा लागला. मात्र निवडणुकीचा कार्यक्रम ऐनवेळी का रद्द करण्यात आला याचे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे. ऐनवेळी निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेंना उधाण आले होते.

२४ नोव्हेंबरला नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाची निवडणुकीचा कार्यक्रम ठरविण्यात आला होता. याचे  परिपत्रक आज दुपारी पालिका कार्यालयाला प्राप्त झाले.  मात्र संध्याकाळी उपजिल्हाधिकारी  यांचे एक लेटर आले त्यात निवडणूक अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आल्याचे नमूद करीत निवडणुकीसाठी पुढील आदेश काढण्यात येतील असे स्पष्ट म्हटल आहे.  निवडणूक कार्यक्रम सूची मध्ये  नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत १५ नोव्हेंबर होती. निवडणुकीचा कार्यक्रम झाल्यानंतर उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी अवघा एकच दिवस मिळत असल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा  इच्छुक  उमेदवारांमध्ये सुरू होती. दोन्ही शहरात  शिवसेनेची सत्ता आहे पक्षीय बलाबलानुसार अंबरनाथमध्ये शिवसेनेचे पारड जड असल्याने सेनेचा नगराध्यक्ष होणार आहे पण नगराध्यक्षपदासाठी भाजपनेही दंड थोपटलेले आहे. तरी सुध्दा सेनेचाच नगराध्यक्ष होईल असे  विश्वास शिवसेनेकडून व्यक्त केला जातोय.  तर बदलापुरात देखील सेनेचाच नगराध्यक्ष होणार आहे. या पदासाठी दावेदार अधिक असले तरी सेनेचा बालेकिल्ला असल्याने भगवाच फडकणार  आहे. मात्र निवडणुक कार्यक्रम ऐनवेळी बदल करण्यात आल्याने सत्ताधारी भाजपकडून राजकीय दबाव आणण्यात आला का अशीही चर्चा ऐकायला मिळत होती. पण  निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या उमेदवारांना अजून प्रतिक्षा करावी लागणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *