श्री अक्षय महाराज भोसलेंचा भारतज्योती प्रतिभा सन्मान पुरस्काराने गौरव
घाटकोपर : मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी च्या वतीने आयोजित राजस्तरीय गुणिजन परिषद , कोल्हापूर येथे सामाजिक क्षेत्रात कीर्तन व संत साहित्याच्या द्वारे जनमाणसात प्रबोधन करून समाज परिवर्तनाचे उत्तुंग कार्य करणाऱ्या श्री अक्षय महाराज भोसले यांना भारतज्योती प्रतिभा सन्मान पुरस्काराने पद्मश्री डॉ.विजयकुमार शहा यांच्या शुभहस्ते श्रीराजर्षी शाहू स्मारक , कोल्हापूर येथे गौरविण्यात आले . या पुरस्काराद्वारे प्रबळ भारत राष्ट्राचे चिंतन करणाऱ्या या संस्थेच्या माध्यमातून व महाराष्ट्रातील तमाम अभ्यासकांच्या दृष्टीने श्री अक्षय महाराज भोसले, बिजवडीकर यांच्या कार्यावर लोकमान्यतेची प्रसन्न गौरव मुद्रा उमटली आहे . पुरस्काराला उत्तर देताना अक्षयमहाराज म्हणाले की’ आजवर जे काही कार्य आमच्याकडून संपन्न झाले यात सर्वच वारकरी संप्रदाय युवा मंचच्या सहकारी वर्गामुळे झाले , हा पुरस्कार त्यांचा प्रतिनिधी म्हणून स्वीकारत आहे .’ सर्वच वारकरी संप्रदाय व समाजातुन महाराजांचे अभिनंदन होत आहे . यापूर्वी त्यांना महाराष्ट्र विभूषण , वारकरी रत्न , स्वामी विवेकानंद समाज रत्न , आर्ट ऑफ लिव्हिंग चा यंग अचविर्स अवॉर्ड आदीने गौरविण्यात आले आहे .