मंगेश तरोळे-पाटील
मुंबई : महाराष्ट्रात कोळी समाज हा प्रामुख्याने मुंबई समुद्रकिनारी व सह्याद्रीच्या पायथ्यार्यांशी तसेच सातपुड्याच्या पायथ्यार्यांशी आदिवासी महादेव कोळी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. विदर्भात सातपुड्याच्या पायथ्यार्यांशी बसलेला महादेव कोळी समाजाची व्यवसाय शेती असल्यामुळे या समाजाला शेती उद्योगाची जोडल्या गेले आहे.
समाजासाठी जिवाचे रान करून जिवाची पर्वा न करता उपोषणाचे खंजीर उपसणाऱ्या कोळी महादेव समाज बांधवांना अखिल भारतीय कोळी समाज ( रजि दिल्ली) महाराष्ट्र शाखेच्या वतीने अध्यक्ष केदारजी लखेपुरीया, महाराष्ट्र, सरचिटणीस महाराष्ट्र सचिन ठाणेकर व मनोज बोइनवाड़ युवा अध्यक्ष महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या वतीने आदिवासी कोळी महादेव जमात विकास संघ (वऱ्हाड) आदिवासी कोळी महादेव समाजाच्या अमरावती विभागाच्या वतीने राजेंद्र उर्फ बाबा जुवार तसेच गजानन चुनकीकर समाजाच्या जात प्रमाणपत्र व वैद्यता प्रमाणपत्र लढयासाठी आमरण उपोषणाला जात प्रमाणपत्राच्या लढयाला अखिल भारतीय कोली समाज रजि दिल्ली महाराष्ट्र शाखा तर्फ़े जाहीर पाठिंबा देण्यासाठी विभागीय कार्यालय अमरावती येथे जावून दि. १२ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष भेट देवून समर्थनाचे पत्र उपोषणकर्त्यांना सुपूर्द करण्यात आले,
यावेळी पत्र देतांना उपोषणकर्ते राजेंद्र उर्फ बाबा जुवार तसेच गजानन चुनकीकर यांना पत्र सुपूर्द करतांना अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे संघटक मंत्री आशिष भोंडे, मंगेश तरोळे-पाटील (पत्रकार) मीडिया प्रवक्ता, शिक्षकरत्न सुनिलजी तरोळे-पाटील, शंकराराव घुगरे, प्रदीप फुकट, गजाननराव यलोने, योगेश ढवळी, विजय वावरे, दादाराव पेटे साहेब रेल आदी मान्यवर उपस्थित होते.
या जमातीचे उगमस्थान हे मध्य-प्रदेशमधील सातपुडा पर्वतातील महादेव डोंगर आहे. ही जमात कालांतराने स्थानांतरित व्हायला लागली. हळु हळु या जमातीचे लोक डोंगराळ भागातून समतल भागात आले. जे प्राथमिक स्थानांतर झाले त्या काळातील बालाघाट म्हणजेच आजचा बेरार (विदर्भ) आणि बेरारला लागून असलेले मध्य प्रदेशमधील पर्वतीय क्षेत्र. यातील काही लोकांनी बेरार प्रांतात म्हणजेच अमरावती, अकोला, वाशीम अशा जिल्ह्यात स्थायिक होऊन तिथेच आपली उपजीविका सुरू केली, ज्यात मजुरी करणे, वनराईत जाऊन डिंक गोळा करणे, तर काहींनी शेतीला पण सुरुवात केली. उरलेले लोक हे पुढे बुलढाणा, जळगाव या जिल्ह्यातून अहमदनगर, नाशिक, पुणे मधील प्रांतात पसरले. अशा या महादेव कोळी समाजातील जात प्रमाणपत्रासाठी जाचक अटी आणि नियम लावून जात प्रमाणपत्र व वैद्यता नाकारली जाते. तर दुसरीकडे सह्याद्रीच्या पायथ्यार्यांशी असलेल्या महादेव कोळी जमातीला सुलभरित्या जात प्रमाणपत्र व वैद्यता दिली जाते. एकाच जातीच्या दोन व्यक्तींना सरकारचा अन्याय अयोग्य आहे वर्षोनवर्षे हा घटनाक्रम चालू आहे, हा कुठेतरी थांबून आदिवासी महादेव कोळी समाजाला सुलभरित्या जात प्रमाणपत्र व वैद्यता मिळावी यासाठी गेले दहा दिवस अमरावती विभागाच्या वतीने आमरण अन्नत्याग उपोषण सुरू आहे. मात्र, झोपेलेला सरकारला आदिवासी महादेव कोळी जमातीची जाण नसल्याने झोपेचे सोंग घेतल्या सरकारची झोप उघडली नसल्याने आता उपोषणकर्ते पाण्याच्या त्याग करण्याच्या मनस्थितीत असल्याचे यावेळी दिसून आले.