डोंबिवली , दि,02 : कल्याण लोकसभेचे खासदार तथा मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत शिवसेना डोंबिवली शहर शाखेच्या वतीने डोंबिवलीतील तीर्थक्षेत्र म्हणून लौकिक असलेले श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरात अखंड शिवजप अनुष्ठान आणि होमहवन करण्यात आला.
कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे व डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी महादेव शंकराच्या पिंडीवर अभिषेक यावेळी केला. डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने खासदार डॉ. शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी कल्याण ग्रामीण मधील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरात अखंड शिव जप अनुष्ठान आणि होम हवन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यात जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आणि शहर प्रमुख राजेश मोरे यांनी महादेव शंकराच्या पिंडीवर अभिषेक करत खासदार डॉ शिंदे यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी जिल्हाप्रमुख लांडगे म्हणाले, खासदार शिंदे यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावे यासाठी हा होमहवन करण्यात आला. महामृत्युंजय जप यावेळी करण्यात आला असून ऋग्वेदात याचा उल्लेख आहे. डॉ शिंदे याठिकाणी अविरत काम करत आहेत. अजून भरीव विकास कामे याठिकाणी करण्यासाठी त्यांना शक्ती, प्रेरणा मिळावी यासाठी या सोहळ्याचे आयोजन केल्याचे लांडगे यांनी सांगितले.
यावेळी डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील, तालुका सचिव बंडू पाटील, डोंबिवली शहर सचिव संतोष चव्हाण, ज्येष्ठ शिवसैनिक एकनाथ पाटील, कार्यालय प्रमुख प्रकाश माने, उपशहरप्रमुख गजानन व्यापारी, गोरखनाथ म्हात्रे, बाळा शेलार,उपशहर संघटक यांसह डोंबिवली शहर व कल्याण ग्रामीण भागातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते या सोहळ्यात सहभागी झाले होते.