तरुणीचा मृत्यू, संतप्त नातेवाईकांकडून एम्स रुग्णालयाची तोडफोड 

डोंबिवली : एक २५ वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या तरुणीच्या नातेवाईकांनी एम्स रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराची काचा फोडण्यात आल्या. या हल्ल्यात रुग्णालयाचा वाहनचालक अजय जाधव हा  किरकोळ जखमी झाला. त्याच्या मांडीला सहा टाके पडले आहेत. मात्र रुग्णालय प्रशासनाने माहिती देण्यास नकार दिला.
एमआयडीसी परिसरात राहणारी नीलम सागर पाटील  या तरुणीला शनिवारी रात्री फुफ्फुसाचा आजार असल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा रविवारी मृत्यू झाला .  त्यानंतर या तरुणीच्य संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराच्या काचा फोडल्या.  हा प्रकार समजताच  मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले, सीसीटीव्हीच्या माध्यमातून पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!