बदलापूर : ठाणे,डोंबिवलीपाठोपाठ सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या बदलापूर शहरात दरवर्षी प्रमाणे यंदा देखील वामन म्हात्रे फाऊंडेशनच्या माध्यमातून आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ ते २५ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या महोत्सवाला हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा खजिना बदलापूरकरांना लुटता येणार असल्याची माहिती बदलापूरचे माजीनगराध्यक्ष तथा आयोजक वामन म्हात्रे यांनी दिली.

आगरी संस्कृती ही बदलापुरातील जुनी संस्कृती आहे.बारा खेड्यांचे मिळून बदलापूर हे गाव बनलेले आहे. शहराच्या प्रगतीत आगरी समाजाचे योगदान उल्लेखनीय आहे.आगरी समाजाची संस्कृती,परंपरा शहरात दिसून यावी, यासाठी मनोरंजन,ज्ञान, प्रबोधन या त्रिसूत्रीतून आगळावेगळा महोत्सव गेल्या काही वर्षांपासून माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या संकल्पनेतून बदलापुरात आयोजित केला जात आहे.
चार दिवसांतील कार्यक्रम २२ डिसेंबर रोजी ‘कॉमेडीचा तडका’ या कार्यक्रमात दीप्ती भागवत, संतोष चौधरी व श्रीकांत नारायण यांचा कार्यक्रम होणार आहे. २३ डिसेंबर रोजी आगरी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. २४ डिसेंबर रोजी सायंकाळी अवधूत गुप्ते यांचा ‘अवधूत गुप्ते नाईट’ हा कार्यक्रम होणार आहे. महोत्सवाचा समारोप २५ डिसेंबर रोजी ‘बॉलीवूड नाईट’ या कार्यक्रमाने होणार असून यावेळी प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर व त्यांचे पती प्रसिद्ध गायक रोहनप्रीत सिंग यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!