नगरसेविकेला अटक करा : आदिवासी विकास परिषदेचा डिसीपी कार्यालयावर मोर्चा
कल्याण ( आकाश गायकवाड) ;–आमदार निधीतून झालेल्या विकास कामांच्या बॅनरवरुन शिवसेना नगरसेवक माधूरी काळे आणि शीतल मंढारी यांच्या हाणामारी झाली होती. याप्रकरणी मंढारी यांच्या तक्रारीच्या आधारे काळे यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना 16 ऑक्टोबर रोजी घडली. गुन्हा दाखल होऊनही काळे यांना कोळसेवाडी पोलिस अटक करीत नसल्याने आदीवासी विकास परिषदेने पोलिस उपायु्क्त कार्यालयावर मोर्चा काढला.
कल्याण पूव्रेतील विजयनगर पोलिस चौकीपासून आदीवासी विकास परिषदेच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात नगरसेविका मंढारी यांच्यासह प्रकाश पंडीत, भारत सोनवणो, सुमित हुमणो, संजय केदारे आदी कार्यकर्ते सहभागी झालेले होते. पोलिस उपायुक्त संजय शिंदे यांची आदीवासी विकास परिषदेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी काळे यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन आठ दिवस उलटून गेले तरी काळे यांना अटक करण्यात आलेली नाही. उपायुक्त शिंदे यांनी काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुरावे गोळा करुन अटकेचा निर्णय घेतला जाईल. चार दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन उपायुक्तांनी दिले असल्याची माहिती हुमणे याांनी दिली आहे. या प्रकरणी माधुरी काळे यांना विचारले असता त्यांनी आरोपचा इन्कार करून है राजकीय द्वेषतुन हा आरोप केला जात आहे.