एमएमआर रिजनमधील करोनावाढीचा घेतला आढावा

कल्याण/ प्रतिनिधी : सध्या लोकांना फिट ठेवण्यावर आमचा भर असून विरोधी पक्ष हे मात्र इथल्या डिझास्टर टूरिजमध्ये व्यस्त आहेत अशी टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.  एमएमआर रिजनमध्ये कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता  राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी कल्याणात बैठक घेऊन कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी आणि मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील कोरोना परिस्थितीची आढावा घेतला.

काही दिवसांपूर्वी विरोधीपक्ष नेते  फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीतील तोकड्या आरोग्य यंत्रणेवर बोट ठेवत टिका केली होती. तसेच २७ गावाचा डिझास्टर केल्याची टीका केली होती. तोच धागा पकडीत आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना हा टोला हाणला.    कल्याणातील स्पोटस कॉम्लेक्समध्ये बैठकीत कोरोनाचा आढावा घेतल्यांनतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टिका केली. ठाकरे म्हणाले की, विरोधी पक्ष हेल्थ आणि डिझास्टर टूरिजम करत आहे. तर आम्ही मात्र लोकांची मदत कशी करता येईल याकडे लक्ष केंद्रीत केले आहे.  आम्ही जशी लोकांची काम करत आहोत, त्याप्रमाणे तुम्हीही करा असेही त्यांनी विरोधी पक्षाला सुनावले.  हे जगातील सर्वात मोठे पॅनडेमिक असून एका शहरापूरता मर्यादित नाहीये. विरोधी पक्षाने कन्स्ट्रकटिव्ह क्रीटीसीजम करावे, इतर राज्यात जाऊन तिकडचा वैद्यकीय प्रतिसाद बघावा, आम्ही कोणावरही दोष न देता काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्याचे बरे वाईट झाले तर आनंद होणारा हा जगातील एकमेव विरोधी पक्ष असल्याची टिकाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कशाप्रकारे काम सुरू आहे या संदर्भात बैठकीत चर्चा झाली.  लोकांना कोरोनाच्या प्रादुर्भावापासून मुक्त ठेवून फिट कसे ठेवता येईल हेच मुख्य उद्दीष्ठ आहे. एमएमआर रिजनमध्ये वाढणाऱ्या कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रशासकीय प्रतिसाद आणि मेडीकल इमर्जन्सी हे दोन महत्वाचे घटक असल्याचे  ठाकरे यांनी सांगितले. तर याठिकाणी आम्ही जम्बो बेड्सची सुविधा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, ऍम्ब्युलन्स आदींची सुविधा वाढवत आहोत. मुंबईप्रमाणे इकडेही अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोचता येईल याचाही विचार या बैठकीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  हाताबाहेर गेलेली कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजवणारे धारावी मॉडेलचे किरण दिघावकरही या बैठकीला उपस्थित होते.  या बैठकीला पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर विनिता राणे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्यासह इतर महापालिकेचे आयुक्त आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!