मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पून्हा एकदा चॅलेंज दिले आहे. अनेक वेळा सांगितले, आज पुन्हा सांगतो तुम्ही वरळीत या किंवा मी ठाण्यात येतो, होऊन जाऊ द्या, असे चँलेज आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे पून्हा एकदा ठाकरे विरूध्द शिंदे असा संघर्ष दिसून आला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री यांना अनेकदा सांगितले तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि माझ्यासमोर वरळीतून लढा नाही तर मी तुमच्या समोर ठाण्यातून लढतो, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभागृहात गैरहजर आहेत. धारावीचा विकास होताना एका व्यक्तीचा विकास नको. निवडणुका घ्यायला हे सरकार घाबरते. निवडणुका होत नाहीत, पुणे, चंद्रपुरात निवडणुका नाही सिनेटची निवडणुक देखील हे घेत नाहीत त्यांच्यात हिंमतच नाही. हे घटनाबाह्य सरकार आहे.

अधिवेशनात अनेक विषय चर्चेला येत आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्री यांना इतर राज्यात हाजीर रहा असे सांगितले म्हणून ते राजस्थानला गेले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महत्वाच्या चर्चेला नव्हते. मी काल AI चा मुद्दा उचलला. एआय हा मोठा घटक आहे . आरोग्य, शिक्षणासाठी एआय महत्वाचे आहे. एआयमुळे गुन्हे वाढू नये, देवेंद्र फडणवीस म्हणाले केंद्र सरकार कायदा तयार करत आहे. AI वापरायचे कसे यावर कसे यावर चर्चा होईल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!