मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दावोस दौऱ्यावरून ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत.”घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांसोबत ५० लोकं दावोस जात आहेत. ५० खोके तसं ५० लोकं. इतकी लोक कश्यासाठी ? “वऱ्हाड निघालला लंडनला तसा हे वऱ्हाड निघाला डाओसला, तसा हा प्रकार आहे अशी टीका ठाकरे यांनी केली आहे
आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ये बोलत होते. दि. १५ जानेवारी ते १९ जानेवारीला दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत आणि १० सदस्यीय शिष्टमंडळ सहभागी होणार आहेत. त्यावरून ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे. हा दौरा आहे की सहल? असा खोचक सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
ठाकरे म्हणाले की, “”तसेच या ५० जणांमध्ये मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, एक खासदार जात आहेत. त्यांचं तिथे काय काम आहे हे कळवलं नाहीये. आता एक माजी खासदार देखील आहेत. याआधी गद्दारी करणाऱ्यांना गुवाहाटी घेऊन गेले, आता गद्दारी केली तर थेट डाओसला घेऊन जात आहेत,” असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.
या दौऱ्यात ५ किंवा ६ लोकांऐवजी एवढे लोक कशाला चाललेत. मुख्यमंत्र्यांचे पीए ओएसडी चाललेत.दोन तीन दलालही घेवून चाललेत. सुट्टी व मजेसाठी चाललेत का? सही करायला एवढा लोक कशाला, बॅगा उचलायला, गाडीला धक्का मारायला चाललेत का ?” यासाठी परराष्ट्रमंत्री आणि केंद्रीय वित्त खातं यांची परवानगी लागते. ५० पैकी फक्त १० लोकांची परवानगी मागितली आणि ती परवानगी केंद्राने दिली आहे. पण ५० लोकं जात आहेत, त्या लोकांची परवानगी मागितली आहे का?” असा सवाल ठाकरे यांंनी उपस्थित केला.