कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून कधीही जाहीर होऊ शकतो. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून भूमिपूजनाचा सपाटा सुरू झालाय. गुरुवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीचा दौरा करीत अनेक विकास कामांचे भूमिपूजन केले. दरम्यान भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी आदित्य ठाकरेंचा पर्यटन दौरा अशी टीका करीत त्यांना दिवसाढवळ्या सप्न पडू लागल्याचा टोला लगावला.
केंद्र शासन, राज्य शासन व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गाडी किल्ल्या लगत उभारण्यात येणाऱ्या नौदल संग्रहालय विकसित करण्याच्या कामाचा आणि 2.5 कि.मी लांबीच्या नदी किनारा सुशोभीकरणाचा भूमिपूजन सोहळा आज राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला, या समयी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, नगरविकास ,सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री जितेंद्र आव्हाड ,. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार रविंद्र फाटक, आमदार गणपत गायकवाड ,महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, माजी महापौर विनिता राणे, शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली, एस.के.डी.सी.एल चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे आदी मान्यवर तसेच महापालिका अधिकारी वर्ग उपस्थित होता.
दुर्गाडी किल्ला लगतच्या किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या आरमाराची नौका बांधण्याची मुहूर्तमेढ रोवली होती, या किनाऱ्याचे ऐतिहासिक महत्त्व जपण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून नदी किनारा व नौदल संग्रहालय विकसित करण्याचा प्रकल्प skdcl मार्फत हाती घेण्यात आला आहे ,यामध्ये समुद्र किनाऱ्याचे रक्षण करणाऱ्या बलाढ्य भारतीय नौसेनेचा अतिविशाल माहितीपट तसेच 2.5 किलो मीटर किनारा सुशोभीकरण दुर्गाडी किल्ल्या लगत बगीचा विकसित करणे, पायवाट व सायकल ट्रॅक बनवणे, लहान मुलांसाठी प्ले एरिया ,व्याख्यान एरिया तयार करणे या सुविधांमुळे कल्याण शहराचा नदीकिनारा विकसित होऊन नागरिकांना मॉर्निंग तसेच इव्हनिंग वॉक करीता पर्याय उपलब्ध होणार आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहाचे उद्घाटन
या भूमिपूजन सोहळ्यानंतर महापालिका भवनातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सभागृहा मध्ये एकूण 145 सन्माननीय पालिका सदस्यांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये प्रेक्षक गॅलरी ,पत्रकार गॅलरी ,महत्त्वाच्या व्यक्तींसाठी व्हीआयपी कक्ष अशी सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. सभागृहामध्ये ऊर्जा कार्यक्षम एलईडी दिवे अत्याधुनिक पद्धतीची विद्युत संच मांडणी देखील करण्यात आली असून 31 टन क्षमतेचे मित्सुबिशी कंपनीची ऊर्जा बचत करणारी VRV प्रकारची अद्यावत मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली आहे. महापालिका उभारत असलेल्या नौदल संग्रहालया बद्दल. पालक मंत्री एकनाथजी शिंदे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि महापालिका अभियंता वर्ग यांची प्रशंसा केली. यावेळी माजी शिक्षण मंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे दुःखद निधन झाल्यामुळे त्यांना सर्व उपस्थितांतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.
डायलेसिस केंद्राचे उद्घाटन
कल्याण पूर्व तिसगाव येथील डायलेसिस केंद्राचे उद्घाटन पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. आर्थिक दृष्ट्या दुर्बल रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत या केंद्रांमध्ये मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध होणार आहे तसेच या योजनेत समाविष्ट न होऊ शकणार्या रुग्णांना रू. 849 /- तसेच एचआयव्ही रुग्णांसाठी रु.851/- अल्पदरात ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
सीबीएसईच्या शाळा सुरू कराव्यात : आदित्य ठाकरे
बृहन्मुंबई महानगरपालिकेप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सीबीएसई च्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू कराव्यात, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे केले.
डोंबिवली औद्योगिक वसाहतीमधील 33 किमी रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन. ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ठाकरे म्हणाले की, वाढत्या लोकसंख्येबरोबरच शहरे, औद्योगिक परिसर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यांचा शाश्वत विकास करत असताना समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच तरुण या सर्व घटकांचा विचार करायला हवा. त्याचप्रमाणे रस्ते, उद्याने, शाळा, स्वच्छ हवा व पाणी आणि आरोग्य सुविधा कडेही लक्ष द्यायला हवे. त्यामुळे आज कल्याण डोंबिवली परिसरातील विविध विकास कामे जोरात सुरू आहेत. त्यासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात राज्य शासनाने अतिशय चांगली कामे केली आहेत. कोविड काळात केलेल्या कामांची दखल जागतिक पातळीवर घेतली आहे. यापुढे ही या भागाचा शाश्वत विकास व्हावा यासाठी कामे केली जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कल्याण डोंबिवलीमध्ये विकास कामांबरोबरच पर्यावरण संतुलनावर भर – पालकमंत्री
पालकमंत्री शिंदे म्हणाले की, सर्वसामान्यांच्या हितासाठी राज्य शासन अनेक निर्णय घेत आहे. त्यांच्यासाठी मूलभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. या भागात विकासाची गंगा आणण्याचे काम होत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील कामांवर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लक्ष देत असतात. रस्ते व उंच इमारती झाल्या म्हणजे विकास झाला असे नाही. त्याबरोबरच खेळांची मैदाने, उद्याने व्हायला हवी. तसेच मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड व शहरी जंगले (अर्बन फॉरेस्ट) निर्माण करण्यावर भर देऊन पर्यावरणाचा समतोल राखला जावा. डोंबिवलीमधील लोकांच्या जिवीतास घातक असे कारखान्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. हे करत असताना येथील कामगारांचाही विचार केला जाईल, असेही पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले.
भाजप आमदार रवींद्र चव्हाण काय म्हणाले