मुंबई, दि. २ः शिवसेना (ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली आहे. जनतेच्या पैशातून होणारा दौरा वायफळ असून तो रद्द झालाच पाहीजे, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली.

आदित्य ठाकरे ट्विटमध्ये म्हटले की, ब्रिटनच्या दौऱ्यावर निघालेल्या उद्योग मंत्री सामंत ब्रिटनमध्ये जाऊन नेमके काय करणार? कोणाला भेटणार? कोणत्या कंपन्यांशी चर्चा करणार? अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली 

गांधी जयंती निमित्ताने, अतिशय नम्रतेने उद्योग मंत्र्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी हा दौरा रद्द करावा. तसेच रजा घ्यायचीच असेल तर स्वखर्चाने अवश्य घ्यावी, पण जनतेचा पैसा यासाठी उडवू नका, असे आवाहन आदित्य ठाकरेंनी केले.

लंडन आणि म्युनिक मधील राऊंड टेबल कॉन्फरन्सला कोण हजेरी लावणार आहे? लंडनमध्ये ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ ची बैठक कोणी आयोजित केली आहे? दावोस ला वर्ल्ड इकोनॉमिक फोरम चा कोणीही प्रतिनिधी आत्ता नसताना आणि तिथे काहीच सुरु नसताना, नक्की कसली पहाणी करणार आहात? या प्रश्नांची ब्रिटन दौऱ्यावर निघालेल्या उद्योग मंत्र्यांनी उत्तरे द्यावीत, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

 आपल्याला निवडून दिलेल्या जनतेची किती काळ थट्टा कराल?, असा सवाल ही त्यांनी विचारला आहे. सरकारकडे परदेशवाऱ्यांवर खर्च करण्यासाठी एवढा पैसा असेल तर, शेतकऱ्यांच्या मदतीची आणि जुन्या पेन्शन योजनेची आपण चर्चा करूया, असे थेट आव्हान दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्षांच्या परदेशी दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंनी धारेवर धरल्याने नियोजित दौरे रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली होती. त्यामुळे आता उद्योगमंत्री काय निर्णय घेतात याकडे लक्ष वेधलंय

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *