डोंबिवलीत आजपासून कायमस्वरूपी आधारकार्ड केंद्र सुरू
डोंबिवली : पूर्वेतील महापालिकेच्या कार्यालयात आजपासून कायम स्वरूपी आधार कार्ड केंद्र सुरू करण्यात आलंय. आज सकाळी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते या केंद्राचे उदघाटन पार पडलं. मात्र उदघाटन होण्यापूर्वीच आधार केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.
पूर्वेतील इंदिरा गांधी चौकातील महापालिकेच्या अत्रे ग्रंथालय आणि वाचनालय असलेल्या जागेत हे आधारकार्ड केंद्र सुरू करण्यात आलंय. या केंद्रात एकूण 6 केंद्राची व्यवस्था करण्यात आलीय.
हे केंद्र सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
आधार कार्ड काढण्यासाठी नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत होता. तसेच आधारकार्ड काढण्यासाठी अव्वाच्या सव्वा रुपये घेतले जात होते. कित्येक वेळा पहाटे लवकर उठून रांगा लावाव्या लागत होत्या. याची दखल घेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने डोंबिवलीत कायम स्वरूपी आधार कार्ड केंद्र सुरू करण्यात आलय. आधार कार्ड केंद्र सुरू होण्यापूर्वीच केंद्रावर नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र कायमस्वरूप केंद्र सुरू झाल्याने डोंबिवलीकरानी सुटकेचा निःश्वास सोडला. आधार कार्ड केंद्राचा डोंबिवलीकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन राज्यमंत्री चव्हाण यांनी केले आहे. याप्रसंगी स्थायी समिती सभापती राहुलदामले, डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष संजीव बिडवाडकर उपाध्यक्ष कैलाश डोंगरे, सरचिटणीस रवी ठाकूर, संदीप अहिरे, महिला पदाधिकारी पूनम पाटील, वर्षा परमार, नगरसेवक विश्वजित पवार, निलेश म्हात्रे, विष्णू पेंढणेकर, संदीप पुराणिक , राजन आभाळे, राजन सामंत, नगरसेविका मनीषा धात्रक यासह शहर पदाधिकारी , सर्व युवा आघाडी, महिला आघाडी पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.
https://youtu.be/oCbCCLCTDLM
Very good sir
Congratulations Sirji Great work
*3 cheers* to Shri Ravindrabhau … Superb relief to Dombivlikar.. Thanks sir…
3 CHEERS to Shri Ravindrabhau…
Pls update address near rajaji path