डोंबिवलीतील आधारकार्ड केंद्र अखेर बंद पडलं
डोंबिवली : मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आलेलं डोंबिवलीतील आधारकार्ड केंद्र अवघ्या काही दिवसातच बंद पडलय. राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने हे केंद्र सुरू करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेनही मध्यवर्ती कार्यालयात सुरू केलंलं आधार कार्ड केंद्र बंद पडलं होतं. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या कारभारावर नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतेय.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेने मध्यवर्ती शाखेत आधारकार्ड केंद्र सुरु केले होते. मात्र तांत्रिक बिघाडमुळे हे आधारकार्ड केंद्र बंद करावे लागले. तर डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयात सुरु झालेले आधारकार्ड हि याच कारणामुळे बंद झाल्याचे केंद्रचालक कैलाश डोंगरे यांनी सांगितले. मात्र यात नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. एकीकडे हे केंद्र सुरु करण्याची मागणी होत असताना दुसरीकडे बुधवारी या केंद्रावर झालेल्या वादामुळे तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करून गुरुवारी पालिकेतील हे केंद्र बंद ठेवले आहे का असा प्रश्न नागरिकांना पडला. सध्या आधारकार्ड केंद्र सुरु करण्याची गरज असताना सदर केंद्र बंद झाल्याने नागरिकांकडून नाराजीचे सूर उमटत आहे. पालिकेतील आधारकार्ड केंद्र बंद झाल्याने गुरुवारी या केंद्रावर आधारकार्ड काढण्यासाठी आलेल्या नागरिकांनी गोंधळ घातला. आधारकार्ड मनसेने जोरदार टीका केली. केंद्र बंद झाल्याने भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजप म्हणजे फक्त घोषणांची पाऊस असल्याची टीका मनसेने जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी केलीय. तर आधार कार्ड केंद्र लवकर सुरु होईल असे केंद्रचालक डोंगरे यांनी सांगितले.