थर्टी फर्स्ट साठी बेस्टच्या जादा बसेस
मुंबई : ३१ डिसेंबर २०१७ च्या रात्री नववर्ष स्वागतासाठी मुंबईतील सागर किनाऱ्यावर येणाऱ्या जनतेच्या सोईसाठी बेस्ट उपक्रमाच्या जादा बुसगाड्या सोडण्यात येणार आहेत.
रविवार दिनांक ३१ डिसेंबर २०१७ च्या रात्री नववर्ष स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच आणि मुंबईतील इतर ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर /चौपाटीवर रात्रीच्या वेळी फिरावयास जाणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी बसमार्ग क्रमांक ७ मर्या. ,१११ ,११२ २०३, २३१, २४७ आणि २९४ वर रात्री १० वाजल्यापासून एकूण २० एकमजली जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या मदतीसाठी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, जुहू चौपाटी, गोराई बीच तसेच चर्चगेट स्थानक (पूर्व) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इत्यादी ठिकाणी वाहतूक अधिकारी, बसनिरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. नववर्ष स्वागताच्या निमित्ताने उपलब्ध केलेल्या जादा बसगाड्यांची नोंद घेऊन या बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन बेस्ट उपक्रमाचे जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोफणे यांनी केलंय.