नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदारसंघातून कंगना रणौत यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर रामायण या मालिकेत रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांना मेरठमधून तिकीट देण्यात आले आहे. नवीन जिंदाल यांना कुरुक्षेत्र, हरियाणातून तिकीट देण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील तरूण आमदार राम सातपुते यांना सोलापूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर सुनील मेंढे यांना भंडारा गोंदिया लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. गडचिरोली चिमूर मधून अशोक महादेवराव नेते यांना तिकीट देण्यात आलंय. अशोक नेते गेले दहा वर्ष गडचिरोलीचे खासदार आहेत.