अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचे निधन

मुंबई (अजय निक्ते) : मराठी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचे शनिवारी सकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. श्रीराम यांनी अनेक मराठी चित्रपटात काम केले. मराठी मालिकांमध्येही त्यांनी आपला ठसा सोडला आहे. त्यांनी ‘आपला माणूस’, ‘अ डॉट कॉम मॉम’, ‘एक अलबेला’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच ‘तुझ्यात जीव रंगला’ यांसह अनेक मराठी मालिकाही त्यांनी केल्या आहेत. डोबिवली पूर्वेतील रामनगर परिसरात ते राहत होते. डोंबिवलीतील टिळकनगर विद्यामंदिरात त्यांचे शिक्षण झाले. कोल्हटकर हे मराठी नाट्य संघांचे ज्येष्ठ सदस्य होते त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *