मुंबई : अभिनेता गोंविदा याने शिंदेच्या शिवसेनत आज जाहीर प्रवेश केला. तब्बल १४ वर्षानंतर गोविंदाने पुन्हा राजकारणात एन्ट्री घेतली आहे. गोविंदाला उत्तर-पश्चिम मुंबईतून निवडणूक रिंगणात उतरविले जाणार असल्याचे समजते. उत्तर पश्चिम मुंबईतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अमोल किर्तीकर यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे गोविंदा याच्या प्रवेशाने ही लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.
अभिनेता गोंविदा याने यापूर्वी २००४ साली उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्याने भाजपाच्या राम नाईक यांचा पराभव केला होता. त्यावेळी त्याला कॉंग्रेसने राजकारणात आणले होते. परंतू राजकारणात त्याला फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे त्याने पुन्हा अभिनयाकडे आपला मोर्चा वळवित राजकारणाला रामराम ठोकला होता. आता गोंविदा याने पुन्हा राजकारणात येण्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा आसरा घेतला आहे. शिंदेच्या शिवसेनेकडून गोंविदाला उत्तर-पश्चिम मुंबईतून उमेदवारी मिळाली तर अमोल किर्तीकर यांच्याशी चांगलाच सामना होण्याची शक्यता आहे.