ठाणे : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्तारुंदीकरणात बाधीत होत असलेल्या दिवा स्टेशन ते दिवा सर्कल परिसरातील अनधिकृत बांधकामावर आज ठाणे महापालिकेच्यावतीने धडक कारवाई करण्यात आली.
या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समितीमधील ६ इमारतीमधील १२३ सदनिका व ४३ गाळे निष्कसित करण्यात आले असून या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर पडले गांव, येथे करण्यात आले आहे. रस्तारुंदीकरणात बाधीत होत असलेल्या दिव्यातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश मा. उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.