डोंबिवली : पिस्तूल आणि चार जिवंत काडतूस बाळगून उल्हासनगर येथील शांतीनगर भागातील जगदंबा मंदिर येथे गंभीर गुन्हा करण्यासाठी आलेल्या एका तरूणाला कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी दुपारी सापळा लावून अटक केली.
दुर्गेशकुमार कैलास वारे (२२) असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव असून तो म्हारळ गावातील रहिवासी आहे.

कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांना उल्हासनगरमधील शांतीनगर इथे असलेल्या जगदंबा माता मंदिराजवळ एक इसम शस्त्र घेऊन येऊन गंभीर गुन्हा करण्यासाठी येणार आहे, अशी गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार
त्याठिकाणी हवालदार प्रशांत वानखेडे, अनुप कामत, विश्वास माने, गोरख शेकडे, बापूराव जाधव यांनी सापळा लावला. त्ठया सापळयात संशयस्पदरित्या फिरणारा दुर्गेश वारे हा अडकला. त्याच्याजवळून ३० हजार रूपये किमतीचे पिस्तूल आणि एक हजार रूपये किमतीची चार जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. त्याच्यावर उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चौकशी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!