डोंबिवली : आर्थिक व्यवहाराच्या वादातून सहकाऱ्याच्या डोक्यात जीवघेणा प्रहार करून फरार झालेल्या हल्लेखोराला  विष्णूनगर पोलिसांनी तब्बल ७ वर्षांनी अटक केली. तुषार सतीश रणपिसे (26) असे या अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव आहे १५ सप्टेंबर २०१४ रोजी ही घटना घडली हेाती.

  डोंबिवली पश्चिमेकडील कुंभारखानपाडा परिसरात ही घटना घडली होती. आर्थिक व्यवहारावरुन तिघांनी एकाला जबर मारहाण केली होती. या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात सतिश रणपिसे, तुषार रणपिसे व परेश जोशी या त्रिकूटा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील सतिश रणपिसे व परेश जोशी यांना तत्काळ अटक करण्यात आली होती. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने या दोघांची जामिनावर मुक्तता केली. मात्र तिसरा आरोपी तुषार रणपिसे हा फरार होता. गुप्त माहितीदारांकडून पोलिसांना  मिळालेल्या माहितीनुसार तुषार हा रिजन्सी गार्डनमागील दावडी गाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जय मोरे आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक संजय सांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश वडणे, पोना कुरणे, पोकॉ कुदंन भामरे, पोकॉ मनोज बडगुजर या पथकाने सापळा लावून मंगळवारी रात्री गावातून तुषार याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!