विदेशी दारूची लाच मागणारा डॉक्टरला अटकेत
मुंबई : आजपर्यंत पैशाची लाच स्वीकारताना अनेक अधिका-यांना आपण पाहिलंय. दारूची लाच स्वीकारताना डॉक्टरला अटक केलय असं तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही पण हो, ही बातमी खरीय. मीरा भाईंदर महापालिकेच्या वैद्यकीय अधिका- याला चक्क विदेशी दारूची लाच स्वीकारताना ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी अटक केलीय. प्रकाश जाधव असे त्या डॉक्टरचे नाव असून, १५ हजार रूपयांची विदेशी दारू स्वीकारताना त्याला अटक केलीय.
मीरा भाईंदर महापालिकेत वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ प्रकाश जाधव यांनी तक्रारदाराला महापालिकेत वैद्यकीय अधिकारी या पदावर नियुक्तीची ऑर्डर देण्यासाठी विदेशी दारूची मागणी केली होती. त्यावेळी तक्रारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली. अखेर शनिवारी पोलिसांनी सापळा लावून डॉ प्रकाश जाधव यांना विदेशी दारू स्वीकारताना रंगेहात अटक केलीय.