अभिनव बँकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंची उडी !
शिवसेना विरुद्ध भाजप सामना रंगणार : 
डोंबिवली ( संतोष गायकवाड) : अभिनव सहकारी बँकेच्या निवडणुकीला आता राजकीय रंग चढू लागला असून, शिवसेनेचे नेते आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे  यांनीही या निवडणुकीत उडी घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शिवसेनेने शंकरकाका भोईर यांच्या समर्थ पॅनलला पाठिंबा दर्शवलाय. तर अभिनव पॅनलचे माजी आमदार रमेशदादा पाटील हे भाजपचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे या निवडणुकीला शिवसेना विरुद्ध भाजप असाच रंग चढलाय.
येत्या ६ मे रोजी बँकेची निवडणूक होत असून, सुमारे 33 हजार १०१ मतदार आहेत. अभिनव पॅनल आणि समर्थ पॅनल आमने सामने आले आहेत. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी समर्थ पॅनलला शिवसेनेचा पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीत अप्रत्यक्षपणे पालकमंत्री उतरले आहे. त्यामुळे समर्थ पॅनलचा जोर अधिक वाढलाय. अभिनव पॅनलमध्ये  मनसे आणि भाजपचे पदाधिकारी निवडणूक रिंगणात आहेत त्यामुळे भाजप- मनसे अशी युती दिसून येते तर समर्थ पॅनलमध्ये शिवसेना आणि कॉंग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी रिंगणात आहेत. त्यामुळे राजकीय दृष्टया  दोन्ही पॅनेल साठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनलीय. त्यामुळे कोण बाजी मारतोय हेच पाहावे लागणार आहे.
**
One thought on “अभिनव बँकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंची उडी !”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!