महाड : शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाड मध्ये जंगी सभा झाली यावेळी ठाकरे यांनी भाजप आणि राज्यसरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. केली. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत जय भवानी जय शिवाजी म्हणा आणि भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करा, अबकी बार भाजप तडीपार, असा नारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेसह भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. शिवसेना संपवली पाहिजे यासाठी काहींनी प्रयत्न केले. पण ज्यांनी शिवसेना वाढवली ते माझ्यासोबत आहेत. माझ्यावर टीका केल्याशिवाय काहींना भाकरी देखील मिळत नसेल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
सत्ता असते त्या ठिकाणी लोक जातात. आज माझ्याकडे सत्तादेखील नाही. भाजपने नीच डाव साधत पक्षाचं नाव, निवडणूक चिन्हं त्यांना (शिंदे गटाला) दिले. माझ्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाशिवाय काहीच नाही. तरीदेखील अनेकजण पक्षात येत आहेत. याचं आश्चर्य वाटत आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
महाड मतदारसंघ भगव्याचा आपला आहे, केवळ निवडणुकी पुरता नाही. शिवसैनिकाला पेटवण्याचा प्रयत्न करु नये नाहीतर मैदानातील फटाके विरोधकांच्या बुडाखाली फुटतील असेही ठाकरे म्हणाले.
तळये गावाचे पुनर्वसनाचे आदेश दिले, पण अद्याप किती लोकांना घर मिळाली. सरकारी आकडेवारीचा संदर्भ. देत दोन वर्षात फक्त १५ घरे दिली. पत्रकारांनी माहिती घ्यावी. हे चुकीचे असेल तर आनंद. इथल्या आमदाराला असा घाम फोडायचाय की नॅपकिन कमी पडेल. दोन वर्ष होत आलीत मग जनतेचे पुनर्वसन का नाही. मुख्यमंत्री सुरत गुवाहटी दिल्लीला जातात इकडे आले होते का? बोम्मई पुन्हा बरळले. अनेक वर्ष तिथे भाषिक अत्याचार सुरु आहे पण आमचे मुख्यमंत्री बाळासाहेबांचे विचार म्हणतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कानडीत जाहीरात करतात. मिंधेंमध्ये हिंमत असेल तर तिथे पत्रकार परिषद घ्यायला हवी असा ही निशाणा साधला.
आज पंतप्रधान म्हणतायत मतदारांना बजरंग बली म्हणा मग तुमचे बळ,५६ इंच छाती कुठे आहे? यापुढील प्रत्येक निवडणुकीत जय भवानी जय शिवाजी म्हणून भाजपला तडीपार करा. सत्यपाल मलिकांच्या मुलाखतीचा संदर्भ. सैनिकांचा उपयोग भाजपने स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी केला. विमाने दिली नाहीत ४० लोक गेलीत आणि हे मते मागत होते अशी टीकाही ठाकरे यांनी केली.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे…
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाडच्या सभेत नारायण राणे यांच्यासह नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यावरही जोरदार टीका केली. मी राणे साहेब आणि त्यांच्या पोरांना जास्त सिरीयसली घेत नाही ,ते भाजपची चाकरी करत आहेत, आणि हे करताना ते आम्ही किती खालची पातळी गाठू शकतो हे दाखवत आहेत, अशी जहरी टीका त्यांनी यावेळी केली..
राज ठाकरेंना डिवचले….
दरम्यान, एकीकडे उद्धव ठाकरे यांची सभा सुरू असतानाच राज ठाकरे यांचीही आज रत्नागिरीत सभा आहे. त्यावरुनही सुषमा अंधारे यांनी एक मिमिक्री आर्टिस्ट रत्नागिरीत उभा आहे, असे म्हणत खोचक टीका केली.