डोंबिवली : आम आदमी पार्टी कल्याण डोंबिवलीतील प्रमुख पदाधीकारी तसेच राज्य समितीतील पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी सकाळी डोंबिवली पश्चिमेत पार पडली.सदर बैठकीत कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुका आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने लढणार असल्याची घोषणा करण्यात आली. सत्ताधारी डोंबिवली शहरात अजून मूलभूत सुख सुविधा पुरवण्यात अपयशी ठरले आहेत.इतके वर्ष भाजपची सत्ता असून सुद्धा शहरातील रस्त्यांवर खड्डे तसेच आहेत अशी टीका आप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांनी केली.तसेच महाराष्ट्र सरकार दिल्लीच्या आप सरकारची कॉपी करून लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यात राबत आहे.लवकरच कल्याण डोंबिवलीकरासाठी आम आदमी पार्टी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार अशी माहिती बैठकी दरम्यान दिली आहे.