मानपाडा पोलीस ठाण्याचे विभाजन करा : आगरी युथ फोरमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
काटई आणि दावडी दोन नवीन पोलीस स्टेशन व्हावीत
डोंबिवली/संतोष गायकवाड : वाढते नागरीकरण, गुन्ह्यांच्या संख्येचा वाढता आलेख या कारणांमुळे मानपाडा पोलीस ठाण्याचे विभाजन करून, काटई आणि दावडी या दोन नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करावी अशी मागणी आगरी युथ फोरमने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. मुख्यमंत्र्यांनी हे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी ठाणे पोलीस आयुक्तांकडे पाठवले आहे अशी माहिती आगरी युथ फोरमचे सचिव प्रकाश भंडारी यांनी दिली. त्यामुळे नवीन पोलीस ठाण्याच्या मागणीला पुन्हा एकदा चालना मिळालीय.
मानपाडा परिसराची लोकसंख्या ७ ते ८ लाखावर पोहचली आहे. मानपाडा पोलीस स्टेशन च्या हद्दीत अनेक गावे आहेत. इथलं नागरीकरण झपाट्याने वाढले असून, गुन्ह्याच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच पोलीस ठाण्यातील अपुरा अधिकार आणि कर्मचारी वर्ग असल्याने गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना कसरत करावी लागते. यापूर्वी दोन पोलीस स्टेशनच्या निर्मितीची मागणी केल्याचे आगरी युथ फोरमच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, विशवनाथ रसाळ, जालिंदर पाटील, प्रभाकर चौधरी , रामकृष्ण पाटील, पांडुरंग म्हात्रे, शरद पाटील, गुरुनाथ म्हात्रे, जयेंद्र पाटील, भानुदास भोईर, संतोष संते उपस्थित होते. जनतेच्या सुरक्षेविषयी आगरी युथ फोरमने पुढाकार घेतल्याने सर्वपक्षीय संघर्ष समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील, गजानन मंगरुळकर आदीने त्यांचे कौतुक करीत आभार मानले. असेही भंडारी यांनी स्पष्ट केलंय.