आगरी समाजाच्या लग्नातील अनाठायी खर्चिक प्रथेविरोधात चळवळ !
डोंबिवली : आगरी समाजात विवाह सोहळ्यात अनाठायी खर्च केला जातो. समाजातील या प्रथा विरोधात जनजागृती करण्यासाठी आगरी वधु वर सामुदायिक विवाह सोहळा समिती तर्फे रविवारी समाज प्रबोधन यात्रा” काढण्यात आली. सकाळी १० वाजता संदप गाव येथून यात्रेला सुरुवात केली. काश्मीर तेथील आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. ही यात्रा संदप गाव, उसरघर, बेतोडे, म्हातार्डी, आगासन, दातीवली, दिवा, साबा, खार्डी, शिळ, फडकेपाडा, पडले, देसाई सात पाडे या गावातुन काढण्यात आली. या यात्रेला समाज बांधवांचा चांगला प्रतिसाद लाभला.समाज बांधवांनी विवाह सोहळ्यात अनाठायी खर्च करू नये असे आवाहन या यात्रेच्या माध्यमातून करण्यात आले. या यात्रेत रिक्षा युनियनचे काँम्रेड काळू कोमास्कर, संघर्ष समितीचे नेते अर्जुनबुवा चौधरी, युवा मोर्चाचे संघटक गजानन पाटील, रेल कामगार सहकारी मंडळाचे अध्यक्ष काँम्रेड जे एन पाटील, आगरी समाज विकास मोर्चाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, मा.नगरसेवक हिरा पाटील, सेव्ह दिवा फांऊंडेशन चे अध्यक्ष रोहिदास मुंडे, हनुमान पाटील पडले गावचे नेते, सामाजिक कार्यकर्ते जगदीश ठाकूर, फिल्म डायरेक्टर महेश बनसोडे, डी वाय एफ चे अँड.रामदास वायंंगडे, सामाजिक कार्यकर्ते जगदीश पाटील,राजेंद्र पाटील आणि रिक्षा युनियनचे व आगरी संस्था/संघटनांचे शेेेकडॉ कार्यकर्ते सामिल झाले होते.
***