आगरी समाजाचे नावलौकिक करणा-या समाजातील
  मान्यवरांचा ” आगरी गौरव पुरस्काराने ” होणार सन्मान 
ठाणे जिल्हा आगरी समाज संघटनेकडून आयोजन 
डोंबिवली (प्रतिनिधी) :  ठाणे जिल्हा आगरी समाज संघटना यांच्यावतीने आगरी समाजाचे नावलौकिक करणारे प्रशासकीय, वैद्यकिय, विधी, इंजिनिअर, क्रिडा, अध्यात्मिक, कला, लेखक, कवी, नाटककार, सिनेकलाकार आदी क्षेत्रात  समाजाचे नावलौकिक करणा-यांना ” आगरी गौरव पुरस्कार २०१९-२०  ने ”  सन्मानित करण्यात येणार आहे. रविवार १७ नोव्हेंबर रोजी, दुपारी ३ वाजता कल्याणातील नेतीवली मेट्रो माॅलमधील पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  यावेळी वसई तुंगारेश्वर पर्वत बालयोगी सदानंद महाराज हे शुभाशिर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तसेच आगरी समाजाच्या मान्यवरांचा गौरव सरन्यायाधीश मदन गोसावी सनदी अधिकारी रविंद्र शिसवे, माजी मंत्री गणेश नाईक जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते  करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून शिवसेनेचे नेते माजी पालकमंत्री एकनाथ शिंदे,  रविंद्र चव्हाण खासदार कपिल पाटील श्रीकांत शिंदे आमदार राजू पाटील किसन कथोरे विश्वनाथ भोईर प्रशांत ठाकूर माजी खासदार संजीव नाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी समाजातील सर्वच मान्यवरांनी व पदाधिकारी कार्यकत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक व संघटनेचे अध्यक्ष रामदास भोईर, कार्यध्यक्ष प्रकाश महाराज म्हात्रे, उपाध्यक्ष भरत जोशी, सरचिटणीस मारुती गायकर, खजिनदार रामचंद्र पाटील, चिटणीस रतन पाटील सर्व सदस्य  यांनी केले आहे.
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *