कुंभारखनपाडा, चिंचोळ्याचा पाडा येथील भूमिपुत्र ग्रामस्थांचा भाजपला पाठिंबा…
रविंद्र चव्हाण आगे बढोच्या घोषणा…
रिंगरूटच्या बधितांना मोबदला मिळवून देणार
डोंबिवली: चिंचोड्याचा पाडा, कुंभारखान पाडा येथील भूमिपुत्र आणि ग्रामस्थांनी भाजपला पूर्ण पाठिंबा देत उमेदवार रविंद्र चव्हाण आगे बढो अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडला. रविवारी विकास म्हात्रे, जनार्दन म्हात्रे यांनी पुढाकार घेत भूमिपुत्रांचा मेळावा घेतला होता. त्याला शेकडो ग्रामस्थ, भूमिपुत्र उपस्थित होते. रिंगरोड मधील बधितांना त्यांचा पूर्ण मोबदला मिळवून देणार असल्याचे चव्हाण यांनी त्यावेळी जाहीर केले. तसेच पाश्चिमेला आगरी भवन उभारणार असल्याचे जाहीर केले.
ग्रोथ सेंटरच्या माध्यमातून रविवारी उमेदवारी जाहीर होताच चव्हाण यांना जाहीर पाठिंबा त्यांनी दिला. त्यावेळी के एस ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. दयानंद म्हात्रे, नंदकुमार म्हात्रे, भरत वझे, विश्वास भोईर, दशरथ म्हात्रे, रमेश पदू म्हात्रे, माणिक म्हात्रे, मंगेश पाटील, बाळा पाटील, विनोद म्हात्रे, किशोर भोईर, नितीन म्हात्रे आदींसह मान्यवर उपस्थित होते. मराठा मंदिरमध्ये गणेश सरवणकर आणि मंडळींनी चव्हाण यांना जाहीर पाठिंबा दिला. वामन म्हात्रे फाऊंडेशन तर्फे २० वर्षे सुरू असलेल्या भाऊबीज सोहळ्याला देखील रविंद्र चव्हाण यांनी भेट दिली. त्यावेळी बाळा म्हात्रे, अनमोल म्हात्रे, माजी नगरसेविका कविता म्हात्रे, ऍड गणेश पाटील आदींसह शेकडो महिला उपस्थित होत्या.