डोंबिवली :- डोंबिवली पूर्वेकडील चार रस्ता परिसरात रस्ता लगत असलेले भले मोठे झाड कोसळल्याची घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.यावेळी रस्त्यावरून जाणारी एक महिला सुदैवाने बचावली . हा वर्दळीचा रस्ता असून देखील यावेळी या ठिकाणी वाहने नसल्याने मोठा अनर्थ टळलाय .भर रस्त्यात झाड कोसळल्याने हा काही काळ रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता . घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली . तत्काळ अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यासह स्थानिक नागरिकांनी झाड बाजूला करण्याचे काम सुरू केले . झाडावर असलेल्या महावितरणच्या विद्युत वाहिनीच्या तारा देखील तुटल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. रस्त्यालगत सुरू असलेल्या गटाराच्या खोदकामामुळे हे झाड कोसळले असून इतर ही झाडांना धोका निर्माण झाल्याचे शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *