डोंबिवली : पश्चिमेतील ज्वेलरी दुकानाला चोरटयाने भगदाड पाडून सुमारे ७५ हजार रूपयांचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे चोरटयांनी शेजारील दुकान भाडयाने घेऊन त्यातून ज्वेलरी दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून ही चोरी केली आहे.

डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा फुले रोड परिसरात रत्न सागर ज्वेलर्सचे दुकान आहे. या दुकानात भिंतीला भगदाड पाडून चोरट्याने 110 किलो चांदी आणि काही प्रमाणात सोन्याचे दागिने चोरले. चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध ही चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर आले. रत्न सागर ज्वेलर्सच्या शेजारीच असलेला रिकामा गाळा काही तरुणांनी भाड्याने घेतला होता. हे तरुण झारखंड येथील राहणारे होते. त्यांनी भाड्याने घेतलेल्या गाळ्याबाहेर मोमोज कॉर्नर नावाचे बोर्ड लावला होता. रात्रीच्या वेळात या दुकानातून शेजारच्या ज्वेलरी दुकानात चोरट्यांनी प्रवेश करत दागिने लंपास केले. ही घटना घडल्यानंतर चोरटे पसार झालेत असून विष्णूनगर पोलीसांनी या तपासा करीता तीन पथके तयार केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!