अलिबाग : मुलाने आपल्या आईलाच जाळले, यात आईचा मृत्यू झाला. अलिबाग तालुक्यातील सुडकोली नवखार गावात ही दुर्दैवी घटना घडली. चांगुणा नामदेव खोत (६५) असे मृत्यु पावलेल्या आईचे नाव आहे.

आरोपी मुलगा जयेश नामदेव खोत (२७) यास पोलिसांनी अटक केली आहे.जयेश खोत याचे त्याची आई चांगुणा खोत हिच्याशी जेवणावरून किरकोळ कारणावरून भांडण झाले. संतापलेल्या जयेशने आईवर हल्ला केला. या हल्ल्यात चांगुणा खोत जखमी झाल्या.

जयेशने जखमी आईला मोकळ्या जागेत नेले. तिच्यावर पालापाचोळा टाकून तिला पेटवून दिले.गावातील लोकांना महिती मिळताच पोलिसांना कळवले. जखमी चांगुणा खोत यांना उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात आणले . उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी जयेश खोत याला पोलिसानी अटक केली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.मुलाने आपल्या आईलाच जाळले, यात आईचा मृत्यू झाला.

अलिबाग तालुक्यातील सुडकोली नवखार गावात ही दुर्दैवी घटना घडली. चांगुणा नामदेव खोत (६५) असे मृत्यु पावलेल्या आईचे नाव आहे. आरोपी मुलगा जयेश नामदेव खोत (२७) यास पोलिसांनी अटक केली आहे. जयेश खोत याचे त्याची आई चांगुणा खोत हिच्याशी जेवणावरून किरकोळ कारणावरून भांडण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *