डोंबिवली/ प्रतिनिधी : कोरोनाविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी  रविवारी डोंबिवलीत ” एक धाव कोवीड ” च्या जनजागृतीसाठी पार पडली.  रनर्स क्लान ग्रुप  आणि शिवसेना शहर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने या मॅरेथॉनचे आयेाजन करण्यात आले हेाते.

रनर्स क्लान ग्रुप डोंबिवली

डोंबिवली पूर्वेतील अप्पा दातार चौक गणेश मंदिर येथून मॅरेथॉनला प्रारंभ झाला. ही मॅरेथॉन पाच कि.मी. असली तरी त्याला मोठया मॅरेथॉनचे स्वरूप प्राप्त झाले होते. सोशल डिस्टन्सिंग सॅनिटायझर आणि मास्क या त्रिसुत्रीचा वापर करण्याचे आवाहन मॅरेथॉनच्या माध्यमातून करण्यात आले. मॅरेथॉनमध्ये सोशल डिस्टन्सिंग सर्व नियम पाळून सर्व धावपट्टूंना पदक देऊन गौरविण्यात आले. ही मॅरेथॉन डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे आणि रनर्स क्लान ग्रुपचे प्रमुख धावपटु लक्ष्मण गुंडप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मॅरेथॉनमध्ये रनर्स क्लान ग्रुपचे डॉ अविनाश भिंगारे, डॉ अविनाश मुकुंद कुलथे, विजय पाटील, सुहास भोपी, प्रिया मिश्रा, विजय सकपाळ आणि लक्ष्मण मिसाळ यांच्यासह आणि अनेक धावपट्टू सहभागी झाले हेाते.
—————–  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *