सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची संकल्पनेतून साकारली प्रतिकृती

डोंबिवली : रामभक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत आहे तो दिवस म्हणजे २२ जानेवारी २०२४ ! या दिवशी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या भव्य अशा मंदिराचे दर्शन होणार आहे.  रामलल्ला या मंदिरात विराजमान होणार आहेत. हा भव्य दिव्य सोहळा बघण्यासाठी लाखो भाविक अयोध्देला जाणार आहेत. या सोहळयाची एकिकडे अयोध्देत जोरदार तयारी सुरू असतानाच दुसरीकडे  कलानगरी समजल्या जाणा-या डोंबिवलीत राम मंदिराचा सोहळा आतापासूनच सुरू झाला आहे. डोंबिवलीत श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. डोंबिवलीकर प्रसिध्द कलादिग्दर्शक  उदय अरविंद इंदप आणि त्यांची कलादिग्दर्शक कन्या सानिका इंदप यांनी ही कलाकृती साकारली आहे. श्रीरामाचे मंदिर हे सर्वांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून हे मंदिर पाहण्यासाठी डोंबिवलीकरांची गर्दी होत आहे.

डोंबिवली जीमखाना येथे डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे.  ६० फूट बाय ४० फूट उंच आकाराची भव्य अशी राम मंदिराची प्रतिकृती आहे. अयोध्येतील राम मंदिराचे बारकावे साकारण्यात आले आहे. राम मंदिराची प्रतिकृती भाविकांसाठी पुढील दोन महिने खुली राहणार आहे.

मागील काही महिने मेहनत घेऊन त्यांनी राम मंदिराची उभारणी केली आहे. कलादिग्दर्शक  उदय अरविंद इंदप आणि सानिका इंदप यांना कलानिपूण प्रभू कापसे यांचीही साथ लाभली. मंदिर प्रतिकृती उभारणीत फॅब्रिकेशन, प्लायवुड, प्लास्टर ऑफ पॅरिस साधनांचा वापर करण्यात आला आहे. मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाईचे काम महेश वामन गावडे यांनी केले आहे.  मंदिरात प्रवेश केल्यानंतर जय जय श्रीराम गाण्याची धून भक्तांच्या कानी गुंजणार आहे. हे गाणे संगीतकार श्रेयस आंगणे, गीतकार श्रीकांत बोजेवार, ज्येष्ठ गायक प्रभंजन मराठे, सुहास सामंत, गौरी कवी आणि सहकलाकारांच्या गायनातून साकारले आहे. 

येत्या नवीन वर्षात जानेवारीमध्ये अयोध्येत राम भक्तांचे राम मंदिर उभारणीचे स्वप्न पूर्ण होत आहे. या मंदिर उद्घाटनाचा जागर राम भक्तांकडून देशभर केला जात आहे. प्रत्येक नागरिकाला अयोध्येत जाणे शक्य होणार नाही. म्हणून स्थानिक नागरिकांना आपल्या घर परिसरात राम मंदिर कसे आहे हे पाहता यावे या उद्देशातून डोंबिवली जीमखाना येथे राम मंदिराची प्रतिकृती उभारणीचे काम डोंबिवली एक सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून करण्यात आले आहेण् अधिकाधिक नागरिकांनी या प्रतिकृतीच्या पाहणीसाठी येण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *