कल्याण, डोंबिवलीत महिनाभरात क्लस्टर योजना लागू होणार :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
मुंबई : मुंबई, ठाण्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीतही महिनाभरात क्लस्टर योजना ( समुह विकास योजना) लागू करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार आप्पा शिंदे, धनंजय मुंडे, निरंजन डावखरे, किरण पावस्कर आनंद ठाकूर यांनी केडीएमसी क्षेत्रात क्लस्टर योजना लागू करण्याबाबत मुख्यमंत्रयानी खुलासा करण्याची मागणी लेख्री प्रश्नाद्वारे केली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्रयांनी ही माहिती दिली.
मुंबई ठाणे शहरांप्रमाणेच कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात समूह विकास योजना लागू करण्याबाबत श्री निवास घाणेकर यांनी मुख्यमंत्री व नगरविकास विभाग यांना निवेदन सादर करून मागणी केलीय. सहसंचालक नगरविकास विभागाकडून सुनावणी घेण्यात आलीय. यासंदर्भात शासनाने काय कार्यवाही केली अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आप्पा शिंदे यांनी केली होती. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, एमएमआर रिजनमधून क्लस्टरची मागणी सातत्याने होतेय. दाटीवाटीच्या क्षेत्रात पूर्नविकास करायचा असेल तर क्लस्टरच्या माध्यमातून शक्य आहे. त्यामुळे एमएमआर रिजनमध्ये एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. सगळया एमएमआर क्षेत्रात क्लस्टर योजना लागू करतोय ही तरतूद त्यात करण्यात आलीय. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतही क्लस्टर योजना लागू होणार आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. कल्याण डोंबिवलीतही क्लस्टर येाजना लागू होणार आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून, यावर सुनावणी होऊन हा प्रस्ताव राज्य सरकारकडे आलाय. सरकार एक महिन्याच्या आत या प्रस्तावावर निर्णय होईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.