विधानसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या शिवसैनिक, नगर रचनाकार नरेशचंद्र कावळे यांचा पुढाकार;
शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप, नारीशक्तीचा सन्मान सोहळा
कुर्ला (९ ऑक्टोबर २०२४) : शिक्षण हेच प्रगतीचे साधन आहे, असे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. आपल्या देशाचे भविष्य ज्यांच्या हाती आहे, त्या नवीन पिढीचे व्यक्तिमत्त्व सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या उत्तम घडावे यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत अधिकार असून सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण हे आमचे ध्येय असले पाहिजे. कुर्ल्यात ही संकल्पना रुजवण्यासाठी, आम्ही जागोजागी मुलांचे मेळावे आणि वह्या वाटपाचे कार्यक्रम आयोजित करत आहोत. ज्याचा लाभ शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला आहे. त्याच मोहिमेचा एक भाग म्हणून आज साबळे नगर परिसरात शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटपाचे कार्यक्रम पार पाडले.
यावेळी पाऊस असूनही मुलांसह पालकांची उपस्थिती खूपच दर्शनीय होती. यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात आमचे योगदान असल्याचा विशेष आनंद होत आहे.
याच कार्यक्रमात नवरात्रोत्सव निमित्त परिसरातील माता – भगिनींचा सन्मान सोहळा देखील पार पडला.
मी राजकारणाच्या माध्यमातून सामाजिक विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहे. या उपक्रमाच्या आयोजनात हातभार लावणाऱ्या सर्व शिवसैनिकांचे, मित्र परिवाराचे आणि उपस्थितांचे मनःपूर्वक आभार.