नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज निवडणूक आयुक्त कायद्याला स्थगिती देण्याच्या याचिकेवरील सुनावणी झाली. सरन्यायाधीशांना निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणा-या निवड समितीमधून काढून टाकणा-या नवीन कायद्याला स्थगिती देण्याची याचिकेत मागणी केली आहे. आता ही मागणी करणा-या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली आहे.निवडणूक आयुक्त नियुक्ती कायदा २०२३ विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात २१ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी सरन्यायाधीशांना पॅनलमधून काढून टाकण्याच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेत सरन्यायाधीशांना पुन्हा पॅनलमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *