कल्याण :- भाजपा माजी नगरसेवकाचा प्रताप समोरा आला असून, महिलेला लग्नाचे अमिष दाखवित शारीरिक संबध ठेवत तब्बल चार वेळा गर्भपात करण्यास भाग पडलेल्या पिडीत महिलेने या प्रतापी आरोपी नगरसेवका विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पिडीत महिलेच्या तक्रीरीनुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याने परिसरात खळबळ उडाली असून आरोपी प्रतापी नगरसेवका तथाकथित कारनाम्याच्या चर्चा रंगल्या असल्याचे समजते.
कल्याण पूर्वेत राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेशी ७ वर्षी पासून लग्नाचे अमिष दाखवित शिवीगाळ, मारझोड करीत शारीरिक संबंध ठेवत ४ वेळा गर्भपात करण्यास भाग पडल्या प्रकरणी पिडीत महिलेने कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये आपली कैफियत मांडली असता पिडीत महिलेच्या तक्रारी नुसार आरोपी मनोज राँय यांच्या विरोधात कोळसेवाडी पोलिसांनी भा.द.वि.३७६ (२) एन), ३१३, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केल्याने भाजपाच्या या आरोपी नगरसेवकाचा प्रताप उजेडात आला आहे.
—–