कल्याण : कल्याणच्या तहसीलदार कार्यालयातील उपलेखापालाच्या विरोधात ६५ हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या उपलेखापालाने स्वतःसह वरिष्ठांसाठी लाच मागितल्याचा आरोप महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात करण्यात आला आहे.
कल्याण तहसीलदार कार्यालयातील कुळवहिवाटा शाखा वर्ग ३ चा उपलेखापाल गंगाधर संतोष आहिरे याने तक्रारदाराच्या शेतजमिनीवरील कुळकायदा कलम ४३ ची शर्थ शिथिल होऊन जमीन भोगवटा वर्ग १ मध्ये रूंपातरित करून देण्याकरिता ६५ हजारांची मागणी केली होती. ही रक्कम स्वतःसह वरिष्ठांना देण्यासाठी मागितली होती. तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. १२ सप्टेंबर रोजी पडळताणी केली असता उपलेखापाल गंगाधर आहिरे याने तक्रारदराकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उप लेखापाल गंगाधर आहिरे याच्या विरूद्ध लाचेची मागणी केल्याच्या आरोपावरून महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुरूवारी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) चे कलम ७, ७(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे