स्वतःही आत्महत्येचा केला प्रयत्न, घटनेनंतर व्यावसायिक झाला पसार, पोलीसांचा तपास सुरू
डोंबिवली, दि,02 : कल्याणमध्ये एका व्यावसायिकाने त्याच्या सात वर्षीय मुलासह पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना आज घडली. दीपक गायकवाड असे या क्रूर पतीचे नाव आहे. दीपकने देखील स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
कल्याण पश्चिमेतील रामबाग लेन नंबर ३ येथील ओम दिपावली इमारतीत दिपक गायकवाड हा त्याची पत्नी अश्वीनी आणि सात वर्षाचा मुलगा आदिराज याच्यासोबत राहतो. आज दुपारी त्याने त्याच्या नातेवाईकाला फोन करुन त्याने पत्नी आणि मुलाची हत्या केली आहे.
तसेच स्वत:ही आत्महत्येचा प्रय्तन केल्याची माहिती दिली. नातवाईकांनी दिपकचे घर गाठले असता त्यांना धक्का बसला.पत्नी अश्विनी व सात वर्षाचा मुलगा आदिराजचा मृतदेह दिसून आला.
तर दीपक पसार झाला होता. या घटनेची माहिती महात्मा फुले पोलिसांना देण्यात आली. महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मुलगा आणि त्याच्या आईचा मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठविले. दीपक हा फरार झाला होता.
हे ही वाचा : Crime News : केडीएमसी कर्मचाऱ्याचे हल्लेखोर गजाआड : हल्ल्याचे कारण गुलदस्त्यात !
दीपक गायकवाड याचा कल्याण शहरात नानूस वर्ल्ड ही महागड्या खेळण्याची दुकाने आहेत. या प्रकरणाचा महात्मा फुले पोलिसांनी तपास करीत आहेत. सध्या पोलीस दीपकचा शोध घेत आहेत. दीपकने व्यवसायातून की अन्य कोणत्या कारणातून असे क्रूर कृत्य केले आहे हे त्याच्या अटकेनंतरच उघड होणार आहे.