कल्याण : एका 13 वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. विघ्नेश पात्रा असे या मुलाचे नाव आहे. विघ्नेश आपले वडील प्रमोद कुमार, आई आणि बहिणीसोबत कल्याण पूर्वेकडील शिवाजीनगर चिकणीपाडा परिसरातील राहत होता.

कल्याण पूर्व परिसरातील एका नामांकित शाळेत इयत्ता आठवीत तो शिक्षण घेत होता . त्याचे वडील नेहमीप्रमाणे कामावर गेले. त्याची आई व बहीण कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. त्या वेळेला त्याने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. विघ्नेशजवळ एक सुसाईड नोट सापडली असून, त्यामध्ये एका मुलाने व शिक्षिकेने त्याला चिडवल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे नमूद केले असल्याची प्राथमिक माहिती आहे. कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत याप्रकरणी नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!