ठाणे : हजुरी विभागातील नागरीकांना कोणत्याही महापालिकेकडून कोणत्याच सोयी सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या निेषेधार्थ आज आज हजुरी नुरी रोड येथे ठाणे महापालिका प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरून धरणे आंदोलन केले. हाजुरीतील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष फिरोज पठाण यांच्या नेतृत्वाखाली शेकडो हाजुरीवासिय रस्त्यावर उतरले. हजुरीतील प्रमुख समस्या सोडविण्यासाठी कोणतेच पाऊल उचलले जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जीलानी वाडीत रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यात यावे,मात्र अनेकदा पत्र व्यवहार तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन सुद्धा प्रशासनाच्या वतीने कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही,उर्दू स्कूलच्या मैदानावर उभारण्यात येत असलेली डाटा सेंटरच्या इमारतीच्या बांधकामा मुळे शाळेचे मैदान बाधित झाले असून ते अद्यापही पूर्ववत करण्यात आलेले नाही,तसेच हजुरी विभागात दर पावसाळ्यात नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरते यावर उपाय म्हणून हजुरी परीसरात पर्यायी नाले तयार करण्यात यावे याकरिता संबधित अधिकाऱ्यांची अनेकदा भेट घेऊन योग्य तो पाठपुरावा करूनही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कोणत्याच प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही, हजुरीतील नुरी रोडचे काम ३ वर्षे उलटून सुद्धा पूर्ण करण्यात येत नाही यासारख्या अनेक समस्या हाजुरीतील नागरीकांना सोसाव्या लागत आहे या विरोधात नागरिकांनी आंदोलन केले.