ठाणे : देशात जन्माष्टमी मोठया उत्साहात साजरी केली जाते तर महाराष्ट्रात दही हंडी सण जोरात साजरा होता मात्र यंदा कोरोनाच्या सावटामुळे राज्य सरकारने दहिहंडी साजरी करण्यावर निर्बंध घातले होती मात्र कोरोनाचे व सरकारचे नियम पाळीत ठाण्यातील एकमात्र मित्र मंडळाने यंदाच्या वर्षी विशेष गटातील मतिमंद मुलांबरोबर प्रतिकात्मक दहिहंडी साजरी केली हा कार्यक्रम ठाणेकांसाठी आकर्षणाचा ठरला
मागील पाच वर्षे सलगपणे रक्तदान, वृक्षारोपण, पूरग्रस्तांना मदत, पालघर, ठाणे येथील आश्रमांना विविध मार्गांनी मदत अश्या विविध सामाजिक उपक्रम राबविण्याऱ्या श्रीनगर ठाणे येथील एकमात्र मित्र मंडळाने यावर्षी ठाण्यातील जागृती पालक संस्थेतील विशेष गटातील मतिमंद मुलांबरोबर प्रतिकात्मक दहीहंडीचा कार्यक्रम राबविला. त्या प्रसंगी कोरोनाचे सर्व निर्बंध ध्यानात घेऊन नियमांचे काटेकोरपणे पालन करून हा उपक्रम राबवताना या विशेष मुलांना चित्रकलेलच्या वह्या, पेन, रंगीत खडू, खेळाचे साहित्य वाटप केले. त्या प्रसंगी एकमात्र मित्र मंडळाचे प्रमुख सल्लागार रामभाऊ येंकुरे श्रीनगर चे स्थानिक नगरसेवक गुरमुखसिंग स्यान आणि एकमात्र मित्र मंडळाचे अध्यक्ष विराज सावंत, रोहित शिर्के, विशाल बनसोडे, ओमकार मयेकर, भावेश झेंडे, शशांक गुरव, रोहित काटकर, कल्पेश गुप्ता ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते सुनील दळवी, जागृती पालक संस्थेचे अध्यक्ष सतीश धुरत, सचिव रहीम मुलाणी आणि कार्यकारी मंडळातील जाधव, चौधरी, कांगणे सदस्यांसोबत महिला पालक आणि जागृती पालक संस्थेतील २० विशेष मुलांनी सहभाग घेतला.