कल्याण : एकदा मोबईल हरवला की तो परत मिळण्याची आशाच सोडून दिली जाते एवढया प्रचंड लोकसंख्येत पोलिस तरी कसा शोध लावणार या निष्कर्षावर नागरिक येतात. पण तंत्रज्ञान एवढे विकसीत झाले की कुठलीही गोष्ट अशक्य नाही. ज्यांचे महागडे फोन हरवले किंवा चोरीलास गेले आहेत असे ५२ मोबाईल कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी शोधले आहेत त्यातील २० नागरिकांना त्यांचे मोबाईल परतही केले.

गेल्या आठ महिन्यात हरवलेले ५ लाख किंमतीच्या ५२ मोबाईलचा छडा लावण्यात कल्याणच्या खडकपाडा पोलिसांना यश आलं आहे. मंगळवारी कल्याण परिमंडळ 3 चे उपायुक्त विवेक पानसरे यांच्या हस्ते २० नागरिकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. तसेच अजूनही काही गहाळ झालेले मोबाईल टप्याटप्याने परत करण्यात येणार असल्याचे उपायुक्त विवेक पानसरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. आपले हरवलेले मोबाईल परत मिळाल्यानंतर या नागरिकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले.

कल्याणमधील खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल हरवल्याच्या तक्रारी सातत्याने दाखल झाल्या होत्या. या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी वपोनि अशोक पवार यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरिक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रज्ञान क्षेत्रात निष्णात असलेले हवालदार सुनील पवार आणि पोलीस शिपाई कुशाल जाधव यांनी तांत्रिकदृष्ट्या अथक परिश्रम घेऊन तपास सुरू केला. कल्याणमधील वेगवेगळ्या भागात हरवलेल्या ५ लाख २५ हजार रुपये किमतीच्या ५२ मोबाईलचा छडा लावण्यात या पथकाला यश आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!