मुंबई : कोरोना, लॉकडाऊन, तिसरी लाट आणि दही हंडी यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढविला. इतर सर्व गोष्टी सुरू आहे परंतु दुसरी, तिसरी लाट सांगत घाबरवले जातंय. फक्त महाराष्ट्रात मुंबईत नियम का? जनआशीर्वाद चालते…. सणांच्या वेळी कोरोना पसरतो? मंदिरे उघडली नाहीत तर मनसे घंटानाद आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी राज ठाकरेंनी दिला.
राज ठाकरे यांनी भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेवरही टीका केली आहे. ते म्हणाले, ‘जन आशीर्वाद यात्रा झाली ती चालली. तेव्हा तुमचा लॉकडाउन नाही. सण आला की लॉकडाउन, म्हणजे सणांमधून रोगराई पसरते. यांच्या जन आशीर्वाद यात्रेतून, मेळाव्यांमधून, हाणामाऱ्यांमधून नाही. हवंय तेवढं वापरायचं आणि जनतेला घाबरवायचं असं सुरु आहे”.
तिसरी लाट …. काय समुद्र आहे का ?
तिसरी लाट येणार असं म्हटलं जात यावर बोलताना राज ठाकरे यांनी काय समुद्र आहे का ? उगाच काहीतरी इमारती सील करुन टाकायच्या. यापूर्वी देशात कधी रोगराई आलीच नव्हती का? अमेरिकेचं अमेरिका पाहून घेईल. आत्ता सर्वांना बंद करुन ठेवायचं आणि यांची आखणी झाली की मग निवडणुका जाहीर करायच्या, की बाकिचे तोंडावर पडतील.
हे’ घराबाहेर पडण्यासाठी घाबरतात तर आम्ही काय करायचं?
सर्व सण-उत्सव साजरे झालेच पाहिजे, तुम्हाला नियम लावायचे आहेत ना? मग सर्वांना नियम एक लावा. प्रत्येकासाठी नियम वेगळा असं करुन चालणार नाही. सरकार सोयीनुसार निर्बंध लावत आहे. हे घराच्या बाहेर पडण्यासाठी घाबरतात तर त्यात आमचा काय दोष? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
मनसैनिकांवर सुडबुध्दीने कारवाई सुरू आहे
अस्वलाच्या अंगावर किती केस आहेत हे अस्वल कधी मोजत नाही तसंच मनसैनिकांवर किती केसेस आहेत हे आहे. हे सर्व सुडबुद्दीने सुरू आहे. शिवसेना जर विरोधी पक्षात असती तर काय केलं असतं? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.