ठाणे : कोरोना आणि  लॉकडाऊनमुळे लाचखोरी काही प्रमाणात कमी झाली असली तरी  अनलॉकमध्ये लाचखोरीची प्रकरणे पून्हा एकदा वाढत असल्याची दिसून येत आहे. सोमवारी कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे हे एसीबीच्या जाळयात अडकले. त्यामुळे कल्याण तहसील कार्यालयातील भ्रष्टाचार चव्हाटयावर आला आहे.   गेल्या आठ महिन्यात ठाणे परिक्षेत्रात  एकूण ५३ सापळे लागले असून त्यात ९७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर मुंबईत  ३६ सापळे लागले असून २५ आरोपी आहेत, मात्र हे भूषावह नसले तरी लाचखोरीत ठाण्याने मुंबईलाही मागे टाकले आहे.

कल्याण तहसिल कार्यलयात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे व शिपाई मनोहर हरड या दोघांना १ लाख २० हजारांची लाच स्वीकारताना अटक केली .कल्याण तालुक्यातील वरप गावातील जमीनीबाबत हरकतीवरील सुनावणीचे निकाल पत्र देण्यासाठीच्या पडताळणी दरम्यान तहसीलदार दीपक आकडे यांनी  १ लाखाची लाच मागितली होती तर शिपाई मनोहर हरड याला २० हजारांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर आज सकाळी एसीबीच्या कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयात सापळा रचत  कल्याण तहसिलदार दीपक आकडे व शिपाई मनोहर हरड या दोघांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.  

लाचखोरीत महसूल विभाग अव्वल

राज्यात गेल्या आठ महिन्यात सर्वाधिक १२५ प्रकरणे महसूल, भूमी अभिलेख, नोंदणी या विभागातून दाखल झाली आहेत, त्यापैकी वर्ग १ चे  १३ अधिकारी, वर्ग २ चे ४ अधिकारी, वर्ग ३ चे १०५ अधिकारी, वर्ग ४ चे ८ कर्मचारी अशा एकूण १८० अधिकारी कर्मचा-यांचा समावेश आहे. यामधील   एकूण सापळा रक्कम २९ लाख ८० हजार ७०० आहे. त्याखालोखाल दुसरा नंबर पोलीस खात्याचा असून, १०४ प्रकरणात १५६ अधिका-यांचा समावेश आहे . यात एकूण सापळा रक्कम ३६ लाख ७५ हजार १०० आहे. त्यामुळे लाचखोरीत महसूल विभाग अव्वल ठरला आहे.

काय घडलं २०२० मध्ये ….

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून २०२० मध्ये राज्यात ६३० प्रकरणात कारवाई करत ८३२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात एकूण एक कोटी ५४ लाख ९३ हजार ४० रुपयांची लाच मागण्यात आली. महसूल विभागात १५६ सापळे रचण्यात आले. त्यात २१७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यात एकूण २८ लाख ३८ हजार ६५० रुपयांची लाच मागण्यात आली होती. पोलिस विभागातील १५४ कारवायांत एकूण २१८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. संशयित आरोपी पोलिस व अधिकाऱ्यांकडून २४ लाख नऊ हजार ८०० रुपयांची लाच मागितली होती.-

१ जानेवारी २०२१ ते २७ जानेवारी २०२१ पर्यंतची आकडेवारी

ठाणे परिक्षेत्र सापळे सन २०२०
ठाणे २३ १८
पालघर ०९ ०२
नवी मुंबई ०९ ०३
रायगड ०८ ०३
रत्नागिरी ०१ ०
सिंधुदुर्ग ०३ ०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *