मुंबई : एक वर्षाहून अधिक काळ मंदिर बंद असल्याने भाजप अध्यात्मिक आघाडीच्या वतीने राज्यात मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद आदी विविध ठिकाणी शंखनाद आंदेालन करण्यात आलं. केवळ मंदिरामुळे कोरोना वाढतो का ? असा सवाल यावेळी भाजप पदाधिका-यांकडून ठाकरे सरकारला करण्यात आला.
राज्यात करोना निर्बंधामध्ये सूट दिल्यानंतर अनेक गोष्टी सुरु झाल्या आहेत. यामध्ये लोकलपासून, दुकाने, हॉटेल यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यामुळे श्रीकृष्णजयंती आणि चौथ्या श्रावण सोमवारच्या मुहूर्तावर भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी तर्फे राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात आलं. मंदिर बंद असल्याने मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीवीकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होते आहे. ठाकरे सरकारला मंदिरे खुली करण्याचा इशारा देण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात आले. आंदेालनात भाजपचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी होते
संभाव्य तिसरी लाट : रात्रीची संचारबंदीची लागू ?
मुंबई, : राज्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्यात रात्रीची संचारबंदी लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तीन दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं राज्याला कोरोना संसर्गाचा दर अधिक असलेल्या भागांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना केली. यावर राज्य सरकार विचार करत असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच केंद्र सरकारनं केलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार नक्की करेल, असंही राजेश टोपेंनी म्हटलं आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असंही त्यांनी सांगितलं. सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजारराहून अधिक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्य रुग्णवाढीत देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यातच केंद्रानं राज्याला रात्रीच्या संचारबंदीची शिफारस केली आहे. रात्रीची संचारबंदीची घोषणा करण्यात आल्याने रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत ५ पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र फिरण्यास मनाई आहे अन्यथा एक हजार रूपये दंड ठेाठावण्यात येणार आहे.