कल्याण ; कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी आज काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी सर्व समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले
या आहेत समस्या ,…
आरोग्य ; शहरात जागोजागी कचरा साठलेला असल्याने दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे रोगराई पसरून नागरिकाच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. साफसफाई मोहिमेत सातत्य ठेवण्यात यावे.
वैद्यकीय सुविधा : पालिकेची कल्याणात रुक्मिणीबाई आणि डोंबिवलीत शास्त्रीनगर ही दोन रुग्णालये आहेत मात्र अपुऱ्या सोयी सुविधामुळे गोरगरिबांना उपचार मिळत नसल्याने मुंबईची वाट धरावी लागत आहे. अनेकवेळा वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
रस्त्याची दुरावस्था : दरवर्षी पावसाळ्यात रस्त्याची दुरवस्था पहावयास मिळते. खड्ड्यांमुळे अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झालीय. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यांकडे पालिका प्रशासनाने लक्ष वेधण्यात आले.
अपुरा पाणीपुरवठा ; काही भागात आजही अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे त्यामुळे याकडे पालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली.
वाढते प्रदूषण : कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक वायू मुळे डोंबिवलीकराना प्रदूषणा चा दामना करावा लागत आहे.
बीएसयूपी प्रकल्प : झोडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत झोपडपट्टी वासीयांना पक्की घरे देण्यात आली आहेत मात्र अनेक ठिकाणी बोगस लाभार्थी घुसवल्याने खरे लाभार्थी वंचित राहिले आहेत तसेच ज्यांना घरे दिली त्यांचे घर देण्यात आले नाही अनेकांनी घरे भाड्या इ दिली आहेत यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करता चौकशी ची मागणी करण्यात आली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला काँग्रेसचा पाठींबा असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे यांनी दिली. कल्याण डेांबिवलीतील विविध समस्यांवर पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांची भेट घेण्यासाठी ते पालिका मुख्यालयात आले होते. नवी मुंबई प्रकल्पासाठी इथल्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लोकनेते दि बा पाटील यांचे मोठं योगदान आहे. त्यामुळे काँग्रेस त्यांच्या नावासाठी आग्रही असल्याचे केणे यांनी सांगितले.