कल्याण ; एकिकडे राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी सत्तेत असली तरी दुसरीकडे काही महिन्यांनी येऊ घातलेल्या कल्याण डेांबिवली महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. कल्याण जिल्हा काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच मुंबईत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्या बैठकीत काँग्रेस कार्यकत्यांनी. स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिलीय.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टिळकभवन येथे कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व आजी- माजी नगरसेवक, ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी कामाला लागा असे आदेश सर्व पदाधिकाऱ्यांना दिले. तसेच काँग्रेस संघटना मजबूत करण्यासंदर्भात अनेक सूचना केल्या तसेच सर्व जिल्ह्यांमध्ये नवीन बूथ तयार करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केलेल्या मागणीनुसार कल्याण डोंबिवलीत काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांचे जनता दरबार घेतले जातील असे आश्वासनही दिले. त्यामुळे काँग्रेस निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसून येत आहे.
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नावं द्यावे ; काँग्रेस ची भूमिका